ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
अयोध्यातून आलेल्या मंगल कलशाचे अक्कलकोट येथे पूजन!

अयोध्यातून आलेल्या मंगल कलशाचे अक्कलकोट येथे पूजन!

प्रकाशन: 13 Dec 2023 07:39 PM
वाचन संख्या 95

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : श्रीरामजन्मभुमी अयोध्या येथुन श्रीराम मंदीर निर्माणपूर्तिचे औचीत्य साधुन अयोध्येवरून आलेल्या पवित्र अक्षता मंगल कलशाचे पूजन अक्कलकोट येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरात शेकडो राम भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या भक्ती भावाने वटवृक्ष देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत अयोध्या येथून आलेल्या पवित्र अक्षता मंगल कलश हा शहर व तालुक्यातील सर्व मंदिरात एक एक दिवस ठेवण्यात येणार आहे. त्या कालावधीत त्या परिसरातील, गावातील रामभक्तांना पवित्र अक्षता मंगल कलशाचे दर्शन घेता येणार आहे. वटवृक्ष मंदिरातील पवित्र अक्षता मंगल कलश पूजनाला मंदिराचे पुजारी मंदार महाराज, वेंकटेश महाराज,तालुका संघचालक रवी जोशी, तालुका कार्यवाह चेतन जाधव,तालुका सहकार्यवाह सुशील हिरस्कर,तालुका प्रचारक यश कुलकर्णी,विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा संयोजक संजय जमादार,तालुका सहसंयोजक मदन राठोड,विश्व हिंदू परिषदेचे भिमराव शेळके,गुंडूअण्णा येळमेली, मोहन साळुंके,संजय भागानगरे,समर्थ स्वामी,मल्लिनाथ स्वामी,रमेश कापसे,शिरीष पंडित,राघवेंद्र बागेवाडीकर,ऋषी लोणारी,ओंकार पाठक,चंद्रकांत वेदपाठक,अक्षय सरदेशमुख,श्रीशेल गवंडी,सचिन हन्नुरे,तोळणुरे,संतोष वगाले,सायबन्ना सोनकांबळे,संदीप कटकधोंड, आदी उपस्थित होते. दिनांक १५ जानेवारी पर्यंत या पवित्र अक्षता मंगल कलशाचे शहर व तालुक्यातील मंदिरात राम भक्तांना दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच एक जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान श्रीरामाची प्रतिमा व पवित्र अक्षता घरोघरी देण्यात येणार आहेत. दि.२२ जानेवारी रोजी घरोघरी पणत्या लावून,रांगोळी काढून, दिवाळीसारखा उत्सव प्रत्येक घरात साजरा करावयाचा आहे. तसेच आपल्या भागात किंवा गावात आल्यानंतर सदर पवित्र कलशाचे दर्शन घेऊन श्री रामाचा आशीर्वाद घ्यावा असे आवाहन श्रीराम जन्मभूमी सेवा समिती,अक्कलकोट यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स