ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
श्री स्वामी समर्थ मठ मसदे-वडाचापाटवर्धापन दिन २४ डिसेंबर रोजी!

श्री स्वामी समर्थ मठ मसदे-वडाचापाटवर्धापन दिन २४ डिसेंबर रोजी!

प्रकाशन: 13 Dec 2023 07:32 PM
वाचन संख्या 72

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरु श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास (रजि.) संलग्न श्री स्वामी समर्थ मठ मसदे, वडाचापाट या मठाचा १२ वा वर्धापन दिन सोहळा २४ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त आयोजित विविध कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत. सकाळी ८ वा.अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका अभिषेक,सकाळी ९ वा.श्री स्वामी समर्थांची षोडशोपचार पूजाअर्चा,सकाळी ९.३० वा. पालखी पूजन, स. १० वा.अक्कलकोट पादुका पालखी मिरवणुक सोहळा, सकाळी ११ वा.महाआरती, दुपारी ११.३० वा. श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरु श्री गावडेकाकामहाराज यांचे आगमन आणि अध्यात्मिक मार्गदर्शन, दुपारी १२.३० वा. श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य अर्पण,दुपारी १ वा.महाप्रसाद (महाअन्नदान),सायं. ५ वा. सुस्वर भजनेसायं. ६ वा.दिपोत्सव,रात्रौ ८ वा.दिंडी पथक-श्री गणेश वारकरी भजन मंडळ – त्रिंबक, ता. मालवण. उपस्थितीचे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ मसदे, वडाचापाट यांच्या वतीने करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स