ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आमदार वैभव नाईक यांच्या प्रश्नावर विधानसभा अध्यक्षांनी शासनाला दिले कारवाईचे निर्देश ; अवैध पर्ससीन व एल इ डी मासेमारीचा मुद्दा.

आमदार वैभव नाईक यांच्या प्रश्नावर विधानसभा अध्यक्षांनी शासनाला दिले कारवाईचे निर्देश ; अवैध पर्ससीन व एल इ डी मासेमारीचा मुद्दा.

प्रकाशन: 12 Dec 2023 09:02 PM
वाचन संख्या 185

ब्यूरो न्यूज | मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या पर्ससीन व एलईडी मासेमारी सुरु आहे. त्यावर कारवाई होण्यासाठी पारंपारिक मच्छीमारांनी सातत्याने आंदोलने करूनही त्यांना न्याय मिळालेला नाही.त्यामुळे अवैध मासेमारीवर शासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज हिवाळी अधिवेशनात केली. दरम्यान गेल्या तीन अधिवेशनांमध्ये या प्रश्नावर सातत्याने चर्चा झाली आहे. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली नाही. पर्ससीन व एलईडीची मासेमारी रोखण्यासाठी या अधिवेशन काळातच शासनाने कार्यवाही करावी असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शासनास दिले आहेत.

नागपूर येथे सुरु असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्गच्या सागरी हद्दीत सुरु असलेल्या अवैध पर्ससीन व एलईडीच्या मासेमारीमुळे स्थानिक पारंपारिक मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अवैधरित्या होणाऱ्या पर्ससीन व एलईडीच्या मासेमारीवर कारवाई व्हावी यासाठी गेली काही वर्षे पारंपारिक मच्छीमार आंदोलने करत आहेत. मात्र अद्यापही शासनाकडून कारवाई झालेली नाही. मच्छीमारांनी अनेक आंदोलने छेडली मात्र अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही. अवैध मासेमारीवर शासनाने कडक कारवाई करावी त्याचबरोबर पारंपारिक मच्छीमारांवर जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते मागे घेण्यात यावेत अशी मागणी आ. वैभव नाईक यांनी सभागृहात केली. त्यावर बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आ. वैभव नाईक यांनी उपस्थित केलेला प्रश्न योग्य असून सिंधुदुर्गात अवैधरित्या सुरु असलेल्या पर्ससीन व एलईडीच्या मासेमारीमुळे पारंपारिक मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गेल्या तीन अधिवेशनात याबाबत सातत्याने चर्चा झाली आहे. मात्र त्यावर कारवाई अद्यापही झालेली नाही. त्यामुळे या अवैधरीत्या होणाऱ्या पर्ससीन व एलईडीच्या मासेमारीवर अधिवेशन काळातच कारवाई करण्यात यावी असे निर्देश त्यांनी शासनास दिले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स