राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा.
सावंतवाडी (सिंधुदुर्ग), दि. ८ डिसेंबर : रोजी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सौ. विभावरी संदीप सुकी (महिला प्रांतिक सदस्या) व चंद्रकांत सखाराम राणे (तालुका सदस्य) यांचा विकास भालचंद्र सावंत (माजी जिल्हाध्यक्ष) यांच्या उपस्थितीत माऊली मित्रमंडळ, नगरपंचायत जुने भाजीमार्केट व्यापारी मित्रमंडळ आणि राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्रमंडळ कणकवली यांच्यावतीने संस्थापक राजेंद्र पेडणेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी राजेंद्र पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त केले आणि सत्काराला उत्तर देताना सत्कारमुर्ती सौ. विभावरी सुकी यांनी कणकवलीच्या मंडळाचे आणि पेडणेकर यांचे आभार व्यक्त करून आम्ही या मंडळाचे ऋणी आहोत असे म्हटले.यावेळी संदीप सुकी (राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी सेल तालुका अध्यक्ष), सौ. विभावरी संदीप सुकी (राष्ट्रीय काँग्रेस महीला प्रांतिक सदस्य), विकास भालचंद्र सावंत (माजी जिल्हाध्यक्ष), चंद्रकांत सखाराम राणे (तालुका सदस्य), अमोल सावंत (राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते), सौ. वैशाली सुर्यवंशी, प्रभाकर कदम, भगवान कासले, अविनाश गावडे, प्रसाद पाताडे, प्रसाद घाडीगांवकर, प्रसाद उगवेकर, ज्ञानेश्र्वर मोडक, सईद नाईक आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)