ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून नागरिकांनी देशसेवेत सहभाग घ्यावा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून नागरिकांनी देशसेवेत सहभाग घ्यावा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रकाशन: 07 Dec 2023 02:28 PM
वाचन संख्या 36

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ

ध्वजदिन निधी संकलनासाठी मुख्यमंत्र्यांनी दिले एक महिन्याचे वेतन

नागपूर/ ब्युरो न्यूज: नागपूर, दि. ७: ध्वजदिन निधी संकलनात नागरिकांनी जास्तीत-जास्त योगदान देत देशसेवेत सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. तसेच, ध्वजदिन निधी संकलनासाठी स्वत:चे एक महिन्याचे वेतन देण्याची घोषणाही मुख्यमंत्री यांनी केली.रामगिरी येथे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने आयोजित केलेल्या ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर उपस्थित होत्या. मुख्यमंत्री म्हणाले, ‘हम करे राष्ट्र आराधन तन से, मन से, धन से, जीवन से’ या ब्रिदाप्रमाणे प्रत्येक भारतीयांनी आपल्या देशासाठी योगदान देण्याची गरज आहे. सीमेवर सैनिक देशरक्षणासाठी अहोरात्र तैनात असतात. देशाच्या प्रगतीतही सैनिकांचे योगदान महत्वाचे आहे. लष्कराच्या कल्याणासाठी खारीचा वाटा उचलण्याची संधी देणारा ध्वजदिन निधी संकलनाचा उपक्रम अनेक वर्षांपासून राज्यात सुरू आहे. सैनिकांप्रती कृतज्ञभाव व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी ध्वजदिन निधी संकलनात योगदान देण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे येण्याचे आवाहन, मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केले. भारत देश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होत आहे. संरक्षण साहित्याची खरेदी करणारा देश म्हणून असलेली भारताची ओळख आता संरक्षण साहित्याचा विक्रेता देश अशी झाली आहे. भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे नुकतेच पंतप्रधानाच्या हस्ते सिंधुदुर्ग किल्यावर अनावरण करण्यात आले. जम्मू-काश्मिरमध्ये देशाच्या सीमेवर कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्याचे सौभाग्य आपणास लाभल्याचा उल्लेखही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केला. ध्वजदिन निधी संकलनात देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त १८५ टक्के ध्वजदिन निधी संकलन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूर जिल्ह्याचा स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी हा सन्मान स्वीकारला. ध्वजदिन निधी संकलनात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स