ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
कोकणातील सुवर्णकारांनी मानले आमदार डावखरे यांचे मानले आभार

कोकणातील सुवर्णकारांनी मानले आमदार डावखरे यांचे मानले आभार

प्रकाशन: 06 Dec 2023 06:25 PM
वाचन संख्या 56

कासार्डे | निकेत पावसकर: दैवज्ञ समाजाचे युवाप्रमुख डॅा. विशाल कडणे यांनी आज कोकणातील ज्वेलरी व सुवर्णकार व्यावसायिक यांच्या शिष्टमंडळासह कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांची ठाणे येथील निवासस्थानी सदीच्छा भेट घेतली. भेटीदरम्यान सिंधुदुर्गातील सुवर्णकारांच्या विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली. सुशिक्षित सुवर्णकार बांधवांना ज्वेलरी व्यवसायामध्ये उद्भवणार्या विविध प्रश्नावर आ. डावखरे यांनी मार्गदर्शन केले. सोने चोरी बाबतच्या विविध प्रकरणांमध्ये कर्नाटक पोलिसांकडुन महाराष्ट्रातील सुवर्णकारांना झालेल्या त्रासाबद्द्ल गेल्या अधिवेशनाच्या दरम्यान आ. डावखरे यांनी प्रश्न विचारुन सातत्याने विषय लावून धरला होता. अडचणीच्या वेळी सुवर्णकारासोबत उभे राहुन त्यांना न्याय मिळवून दिल्याबद्ल कणकवलीहुन आलेल्या सुवर्ण व्यावसायिकांनी डावखरे यांचे आभार मानले. हिवाळी अधिवेशनामध्ये पदवीधरांच्या विविध प्रश्नांवर चर्चा घडवून आणुन रोजगार व उद्योग बाबतीत नवनवीन उपाययोजना आणणेबाबत आ. निरंजन डावखरे नेहमीच अग्रेसर असतात आणि गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांनी केलेल्या कामामुळे कोकणातील पदवीधर मतदारसंघामध्ये प्रसन्न वातावरण असुन त्याबद्दल आ. डावखरे यांचे आभार मानन्यासाठी कोकणातील व्यावसायिक तरुणांचे शिष्टमंडळ डावखरे यांच्या भेटीला आले असल्याचे दैवज्ञ समाजाचे युवाप्रमुख आणि मुंबई हाऊसिंग फेडरेशन संचालक विशाल कडणे यांनी सांगितले. भेटीदरम्यान आ. निरंजन डावखरे यांचा शाल व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स