ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
उद्योगपती दीपक अगरवाल यांच्यातर्फे जिल्हा परिषद शाळा निगुडे नं. १ येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप

उद्योगपती दीपक अगरवाल यांच्यातर्फे जिल्हा परिषद शाळा निगुडे नं. १ येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप

प्रकाशन: 05 Dec 2023 04:42 PM
वाचन संख्या 49

बांदा/प्रतिनधी:बांदा, दि-०५:- निगुडे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं.०१ इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तसेच अंगणवाडी विद्यार्थ्यांना मुंबई येथील उद्योगपती दीपक अगरवाल यांच्या सौजन्याने गावातील शासकीय निवृत्त अधिकारी गजानन नरसुले यांच्या सौजन्याने वह्या व खाऊ वाटप त्याचप्रमाणे सातवीच्या विद्यार्थ्यांना कॅम्लीन कंपास बॉक्स देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद शाळा निगुडे शाळा नं. १ च्या मुख्याध्यापिका गौरवी पेडणेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. व त्या म्हणाल्या कि मी शाळेत येऊन फक्त ६ महिने झाले परंतु गेली १५ वर्ष सातत्याने आपले वय ८१ वर्ष असताना सुद्धा रेल्वेतून प्रवास करत ते विद्यार्थ्यांना वह्या गावापर्यंत पोहोचवण्याचं काम नरसुले काका करतात. हे अतिशय एखाद्या तरुणास लाजवणारी गोष्ट आहे सामाजिक कार्यात नेहमी ते सहभाग घेतात हे खरोखर कौतुकास्पद आहे आपण शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानतो. यावेळी नरसुले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की मी या शाळेत शिकलो लहानाचा मोठा झालो शाळेला १०० वर्षे झाली आणि त्या शतक महोत्सव कार्यक्रमात मला सहभागी होता आलं. हे माझं मी भाग्य समजतो माझं शरीर जोपर्यंत साथ देईल तोपर्यंत मी शाळेला विद्यार्थ्यांना सहकार्य करणार असं त्यांनी अभिवचन दिलं. यावेळी व्यासपीठावर निगुडे गावचे सरपंच श्री लक्ष्मण निगुडकर यांनीही नरसुले यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर जाधव, उपाध्यक्षा नेहा पोखरे, निगुडे माजी उपसरपंच श्री. गुरुदास गवंडे शिक्षक कुसाजी मेस्त्री, रूपाली नेवगी, पांडुरंग होंडे, नारायण नाईक, ग्रामस्थ कृष्णा निगुडकर आदी उपस्थित होते. तर शिक्षक पांडुरंग होंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स