ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
नौसेना दिनासाठी एसटी महामंडळाची जय्यत तयारी, संपूर्ण जिल्ह्यातुन तब्बल 266 गाड्यांची व्यवस्था !

नौसेना दिनासाठी एसटी महामंडळाची जय्यत तयारी, संपूर्ण जिल्ह्यातुन तब्बल 266 गाड्यांची व्यवस्था !

प्रकाशन: 03 Dec 2023 06:47 PM
वाचन संख्या 54

ब्युरो न्यूज/ मालवण: नौसेना दिन सोहळा नागरिकांना पाहता यावा यासाठी एसटी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध एसटी आगारातून तब्बल २६६ गाड्या गावागावातून प्रवाशांना घेवून तारकर्ली येथील सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येणार आहेत. शहरातील दांडी आवार याठिकाणी सर्व गाड्या थांबविण्यात येणार असून तेथून सर्व प्रवाशांना भव्य मंडपात बसून कार्यक्रम पाहण्याची संधी मिळणार आहे. हजारो माणसे या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता गृहित धरून प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे.या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम न भुतो न भविष्यती असाच होणार असल्याचे सांगत सर्व प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. मालवण तालुक्यातून ४८ गाड्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. सर्व गाड्या रात्री वस्तीला त्या त्या गावात जाणार असून सकाळी लवकर प्रवासी वर्गाला घेऊन गाड्या मालवण शहरात दाखल होणार आहेत. सकाळ पासून गाड्या येण्यास सुरूवात होणार आहेत. या सर्व गाड्या दांडी आवार याठिकाणी ठेवण्यात येणार आहेतसर्व गाड्यांतील चालकांना गाड्या सोडून कुठेही जावू नये असे निर्देश देण्यात आलेले आहेत. पोलीसांच्या सूचनेनुसार गाड्या पार्किंग मध्ये ठेवून त्याच ठिकाणी थांबून राहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. प्रवासी वर्गाने ज्या गाडीतून आपण आलो त्या गाडीचा नंबर लक्षात ठेवून पुन्हा त्याच गाडीत येवून बसावे म्हणजे त्यांना पुन्हा त्यांच्या गावी जाताना कोणताही त्रास होणार नाही, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे. एसटी प्रशासनाकडून जास्तीत जास्त ग्रामस्थांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. ४ डिसेंबर रोजी सकाळी गावातूनच गाडी सुटणार आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स