पंचायत समिती आपल्या दारी अंतर्गत उद्या गण कोळंब व आचरा यांच्या आढावा बैठका..!
आचरा | अनिकेत पांगे : ‘पंचायत समिती आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत उद्या दिनांक 13 ऑक्टोबर रोजी पं.स.गण कोंब व आचरा यांची http://localhost/news/public/uploads/2021 ची आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत विविध योजना, विकासकामे यावर चर्चा होणार असून कोविड 19 प्रादुर्भावासंबंधी योग्य ती काळजी घेऊनच ही बैठक होणार आहे.
कोळंब गणात समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायती कोळंब,रेवडी,हडी, मिर्याबांदा, कांदळगांव यांची आढावा बैठक हडी ग्रामपंचायत येथे दुपारी 10:30 वाजता होणार आहे तर आचरा गणातील आचरा, तोंडवळी व वायंगणी गणाची बैठक दुपारी 03:30 वाजता आचरा ग्रामपंचायत येथे होणार आहे.
सदर बैठकांना ग्रामपंचायत सदस्य,उपसरपंच,शिक्षक, तलाठी,आरोग्य सेवक, आरोग्य सेविका,कृषी सहाय्यक व इतर सदस्य,सर्व समिती सदस्य यांना ग्रामपंचायतींमार्फत आढाव्याविषयी सर्व तयारी पूर्ण करत उपस्थित राहण्याची माहिती करुन द्यावयाची आहे.
ही माहिती संबंधीत सरपंच,ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांना पंचायत समिती मालवणचे उच्चस्तरीय गटविकास अधिकारी श्री.जयेंद्र जेधे यांनी दिली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)