ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
गोळवणमध्ये विवाहित महिलेने राहत्या घरी लावून घेतला गळफास..!

गोळवणमध्ये विवाहित महिलेने राहत्या घरी लावून घेतला गळफास..!

प्रकाशन: 12 Oct 2021 09:04 PM
वाचन संख्या 92

पोलिसांत आकस्मित मृत्यूची झाली नोंद ; पुढील तपास सुरु…


मालवण | वैभव माणगांवकर :
मालवण तालुक्यातील गोळवण येथील जयश्री बाळकृष्ण खरात (वय २७) या विवाहितेचा मृतदेह मंगळवारी दुपारी तिच्या राहत्या घरी गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला. सदर घटनेबाबत मालवण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास मालवण पोलीस करत आहेत.

मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयश्री यांचा विवाह पाच वर्षांपूर्वी बाळकृष्ण खरात यांच्याशी झाला. ते दोघेच घरात राहत होते.मंगळवारी बाळकृष्ण हे मालवण येथे कामास आले होते. दुपारी घरी परतल्यावर पत्नीचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. घरात पाहिले असता गळफास लावलेल्या स्थितीत जयश्री यांचा मृतदेह दिसून आला. पोलिस निरीक्षक एस एस ओटवणेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, रुक्मांगद मुंडे आदी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. जयश्री यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात होते. अधिक तपास पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलीस करत आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स