ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अक्कलकोट वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांचा वाढदिवसानिमित्त स्वामीभक्त व नागरिकांकडून सत्कार.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

अक्कलकोट वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांचा वाढदिवसानिमित्त स्वामीभक्त व नागरिकांकडून सत्कार.

प्रकाशन: 16 Nov 2023 08:21 AM
वाचन संख्या 112

मसुरे | प्रतिनिधी : श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. या प्रसंगी अक्कलकोट शहर व तालुक्यातील लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक व स्वामी भक्त तसेच वटवृक्ष मंदिर विश्वस्त समिती तसेच कर्मचारी व सेवेकरी यांच्या वतीने देवस्थानच्या अतिथी कक्षात महेश इंगळे यांचा वाढदिवस शाल, पुष्पगुच्छ देवून, केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महेश इंगळेंबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी महेश इंगळे यांचे व्यक्तीमत्व अत्यंत विनम्र स्वभावाचं, धार्मिक नेतृत्वाबरोबरच शैक्षणिक, सामाजिक, व राजकीय नेतृत्वाची कास सांभाळत चालणारी आहे. त्यांची ही सेवा तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळेच त्यांचा मित्र परिवार अक्कलकोट पुरता मर्यादित न राहता परदेशात देखील त्यांचा भक्त व मित्र परिवार आहे. यापुढील त्यांचे कार्य स्वामी समर्थांची सेवा करण्यामध्ये व अक्कलकोटला एक मध्यवर्ती पर्यटन केंद्र निर्माण करण्यामध्ये व्यतीत होवो असे मनोगत व्यक्त करून महेश इंगळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आज महेश इंगळेंच्या वाढदिवसानिमित्त तालुक्याचे विद्यमान आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले व विश्वस्त मंडळ, मुंबई महावितरणचे पीआरओ मिलिंद अवताडे, जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर गृह शाखेचे नायब तहसीलदार बालाजी बनसोडे, अक्कलकोट शरणमठाचे विश्वस्त
बसवराज अलमद,कोळी समाजाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अरुणभाऊ लोणारी, मा. आमदार शिवशरण पाटील, नगरसेवक तथा अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, नगरसेवक महेश हिंडोळे, रईस टिनवाला, अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, संतोष पराणे मित्र परिवार, कै. कल्याणराव इंगळे महाविद्यालयाच्या वतीने प्रा नागनाथ जेऊरे व स्टाफ आदीसह शहरातील आजी माजी नगरसेवक, शहरातील जगदंब प्रतिष्ठान, शक्तिदेवी प्रतिष्ठान, आझाद गल्ली मित्र मंडळ, बेडर गल्ली मित्र मंडळ, स्विमिंग गृप, संतोष पराणे मित्र मंडळ, कै. उमेश इंगळे मित्र मंडळ, पत्रकार संघ, नाभिक समाज संघटना, नाईकवाडी गल्ली मित्र मंडळ, कराड येथील हुतात्मा बहुउद्देशीय सामाजिक संस्था, तसेच शहरातील व्यापारी शिवपुत्र हळगोदे, प्रसाद पाटील सर, शिवशरण अचलेर, संतोष फुटाणे, चंद्रकांत सोनटक्के, ईरण्णा पाटील, अविनाश मडीखांबे, खाजप्पा झंपले मित्र मंडळ, अब्दूल शेख, अमर पाटील, गंगाधर मोरे, गिरीश पवार, संजय पवार, प्रसाद सोनार, बंडेराव घाटगे, अब्दुल शेख, ज्ञानेश्वर भोसले, रवि मलवे, ऋषिकेश लोणारी, श्रीशैल गवंडी, संतोष जमगे, प्रकाश सुरवसे, बिराजदार सर, जगताप सर, योगेश पवार, कराडचे स्वामीभक्त प्रशांत शिंदे, राजेंद्र वाचकवडे, सोनाली वाचकवडे, शुभांगी जगताप, सुनीता वाचकवडे, संतोष जाधव, प्रसाद पाटील सर, डॉ.शिवराया आडवितोटे, राजू नवले, मंगेश जाधव, योगेश लोकापूरे, प्रा.विजयकुमार लिंबीतोटे, आदींनी महेश इंगळेंचा शाल, पुष्पगुच्छ मिठाई देवून केक कापून सत्कार केला.

या प्रसंगी बोलताना इंगळे यांनी समाजातील सर्वांनीच आपल्यावरील व्यक्त केलेल्या प्रेमामुळे आपणा सर्वांचे ऋणी असून या पुढेही आपणा सर्वांचे स्नेह असेच कायम रहावे असा मानस व्यक्त केला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स