ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
'त्यांनी' आपला बोरीया बिस्तर घेऊन त्यांचा गांव गाठावा अन्यथा मनसे खळखट्याक करणारच : अमित इब्रामपूरकर
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

'त्यांनी' आपला बोरीया बिस्तर घेऊन त्यांचा गांव गाठावा अन्यथा मनसे खळखट्याक करणारच : अमित इब्रामपूरकर

प्रकाशन: 15 Nov 2023 05:19 PM
वाचन संख्या 402

आता ‘ते’ शेठ होतील व भूमीपुत्र चाकर होईल असे सांगत भाजपावर त्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप करत केला हल्लाबोल..!

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्हा मनविसेचे माजी जिल्हा पदाधिकारी व ज्येष्ठ मनसैनिक अमित इब्रामपूरकर यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे परप्रांतीय जेसीबी, बंपरवर व ट्रॅक्टर वाल्यांना भाजपाचे पुढारी छुपा पाठिंबा देत असल्याचा आरोप करत हल्लाबोल केला आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील कामगारांनी स्थानिक जेसीबी, ट्रॅक्टर व डंपर व्यवसायात शिरकाव करून कमी दरात सेवा सुरु केल्याने स्थानिक जेसीबी ट्रॅक्टर व डंपर व्यवसायिकांच्या व्यवसायास फटका बसत असल्याबाबत मालवणातील स्थानिक व्यवसायिकांनी या विरोधात आवाज उठवत संबंधित परजिल्ह्यातील व्यवसायिकांना मज्जाव केला होता. एकीकडे भाजप जिल्ह्यातील उत्तर भारतीयांची संघटना बांधत आहे तर दुसरीकडे मालवणात भाजपमधील ‘पुढारी’ परप्रांतीयांच्या व्यवसायांना छुपा पाठिंबा देत आहे. जर भाजप स्थानिक व्यावसायिकांच्या विरोधात पक्षीय राजकारण करत परप्रांतीयांना पाठिंबा देणार असेल तर मनसेची भूमिका स्थानिक व्यावसायिकांच्या बाजूने खळखट्याकची असेल असे परखड मत मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी मांडले आहे.

जनतेने सत्तेत असलेल्या भाजपचा खरा चेहरा ओळखावा. राज ठाकरे यांनी सातत्याने परप्रांतीयबद्दलची मनसेची भूमिका मांडली आहे. माजी आमदार व मनसे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी उत्तर भारतीयांच्या संघटनेबद्दल बोलताना भविष्यात सिंधुदुर्गातील सरपंच परप्रांतीय असण्याची भीती व्यक्त केली होती. भाजपकडून परप्रांतीयांची संघटना स्थापन करून जिल्हावासीयांना दिवाळी भेट दिली का असा प्रश्नही उपस्थित केला होता.

आज मालवणात जे डंपरवर हमाल होते ते आता डंपर मालक झाले काहींनी जेसीबी मशीन घेतली. स्थानिक व्यवसायिकांपेक्षा कमी दर लावून आपल्या मशीनरी मालवणात भाड्याने देत आहेत. जेसीबी, ट्रॅक्टर व डंपर आपल्या राज्यातून अल्पव्याजदराने कर्जावर आणत आहेत. हा प्रकार रोखण्याची ही आत्ताच वेळ आहे. आता हे लोक जमिनी घेतील घरे बांधतील आणि शेठ होतील व भूमीपुत्र चाकर होईल. परराज्यातील गुन्हेगारी सुद्धा मालवणात येईल आणि वाढेल. स्थानिक व्यावसायिक मात्र उपरे होतील. वेळ निघून जाण्याअगोदर स्थानिकांनी अजून संघटित होऊन परप्रांतीय व्यवसायिकांना शहरातून हुसकावून लावणे आवश्यक आहे. त्यासाठी गरज पडल्यास मनसे खळखट्याक करेल. मालवण शहरातील अनेक तरुण मोठ्या मेहनतीने कर्ज घेऊन वाळू, डंपर, ट्रॅक्टर, जेसीबी यांचा व्यवसाय करत आहेत.यात वाळू व्यवसायात शासन हस्तक्षेप करत आहे. पंधरा वर्षांपूर्वी अनेक तरुण वाळू व्यवसायात उतरले होते तशी वाळू व्यवसायाची परिस्थिती सध्या नाही.डंपर ट्रॅक्टर आणि जेसीबीवर स्थानिकांचा रोजगार अवलंबून आहे. मालवणात होणारे बांधकाम हे मोठ्या शहराप्रमाणे विस्तीर्ण नसून तालुक्यातील काही छोट्या भागामध्येच बांधकामे होतात आणि या व्यवसायात परप्रांतीय व्यावसायिक उतरल्यास त्याचा फटका स्थानिक व्यवसायिकांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे मालवणातील अशा परप्रांतीय व्यवसायिकांनी आपापले जेसीबी, ट्रॅक्टर व डंपर घेऊन आपला बोरीया बिस्तर घेऊन आपले गांव गाठावे या स्थानिक व्यावसायिकांच्या संघटनेच्या भूमिकेला मनसेचा पाठिंबा असल्याचेही मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स