बॅरिस्टर नाथ पै सेवांगण कट्टा येथे विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण व प्रा. मधु दंडवते सेवा निधी वितरण कार्यक्रमाचे आयोजन.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या कट्टा येथील बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथे १६ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता प्रा. मधु दंडवते यांच्या स्मृतीदिना निमित्त कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमात विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण व प्रा. मधु दंडवते सेवा निधी वितरण संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला निवृत्त प्रशासकीय अधिकारी श्री. महेंद्र महाभोज यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाचे सर्वांना सस्नेह निमंत्रण बॅरिस्टर नाथ पै सेवांगण कट्टा यांचे कार्यवाह शाम पावसकर व अध्यक्ष किशोर शिरोडकर यांनी दिले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)