ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सरवणकर तुमच्या सोबत होते तेंव्हा चांगले आणि आता आमच्या सोबत आहेत तेंव्हा ते वाईट झाले का ; शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचा आदित्य ठाकरेंना सवाल.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सरवणकर तुमच्या सोबत होते तेंव्हा चांगले आणि आता आमच्या सोबत आहेत तेंव्हा ते वाईट झाले का ; शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचा आदित्य ठाकरेंना सवाल.

प्रकाशन: 09 Nov 2023 02:18 AM
वाचन संख्या 237

सरवणकरांच्या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट अध्यक्ष पदी नियुक्तीमुळे पोटात दुखत असेल तर पाटणकर काढा घ्या असाही दिला उपरोधिक सल्ला…!

मुंबई | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांच्या एका ट्विटवरुन पत्रकार परीषद घेत प्रतिप्रश्न केला आहे. आमदार सदा सरवणकर हे जोवर तुमच्या सोबत होते तर तोपर्यंत चांगले होते. आज आमच्यासोबत आले तर ते वाईट झाले का? वास्तविक, सदा सरवणकर हे सिद्धिविनायकाचे निस्सीम भक्त आहेत. त्यांनी सिद्धिविनायक परिसराच्या सुशोभिकरणासाठी २५ कोटींचा निधी आणला. तसा निधी तुम्ही कधी का नाही आणलात? तुम्ही का विकासकामे केली नाहीत? त्यांच्या नियुक्तीमुळे तुमच्या पोटात दुखत असेल तर पाटणकर काढा घ्या, असा उपरोधिक सल्ला शिक्षणमंत्री व मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना दिला आहे.

आमदार सदा सरवणकर यांची सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावर माजी मंत्री, युवानेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून टीका केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, दादरमध्ये यापूर्वी घडला नव्हता असा प्रकार ज्याने केला, आमच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत ज्याने बंदूक रोखली, टीव्हीवर देखील ते दाखवण्यात आलं. नंतर पोलिसांनीही सांगितलं की, गोळी त्यांच्याच बंदुकीतून चालवली गेली होती. त्या गद्दार व्यक्तीची चौकशी आणि अटक तर सोडाच, मिंधे- भाजप सरकारने आज त्यांना सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून बसवले. हिंदू सणात विघ्न आणणाऱ्या त्या व्यक्तीचे लायसन्स आणि बंदूक जप्त झाली पाहिजे होती, अटक व्हायला हवी होती! पण… या कृत्याबद्दल त्याला बक्षीसच मिळाल्याचं दिसतेय! मिंधे-भाजप गँगच्या गद्दारांचं हे कोणतं हिंदुत्व? आमच्या सणवाराला, गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक रोखणारे हे सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून कसे शोभतात? खरंतर भाजपा किंवा गृहमंत्र्यांकडून ह्या गोष्टीचा विरोध व्हायला हवा होता. पण कदाचित हे गद्दारीचं आणि महाराष्ट्रद्वेषाचं बक्षीस दिलं असेल. अशा शब्दात माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी आमदार सदा सरवणकर यांच्याबाबत टीका केली होती.

शिक्षणमंत्री व पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी मुंबई महापालिकेच्या पत्रकार कक्षात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले. वास्तविक, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टवर यापूर्वी फक्त अध्यक्ष बसविण्याचे काम करण्यात आले होते. मात्र मंदिराला प्रवेशद्वार नाही, मंदिर परिसरात सुशोभीकरण नाही. ही सर्व कामे तुम्ही त्यावेळी तुमचा अध्यक्ष असताना का करून घेतली नाहीत ? आता आम्ही विकासकामे करीत आहोत ते तुम्हाला ते का खटकते, असा सवाल उपस्थित करीत पालकमंत्री केसरकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

आम्ही जनतेसाठी विकासकामे करीत आहोत. लोकांच्या भावना भडकवत नाही. आम्ही तर महालक्ष्मी मंदिर येथे रस्ता मोकळा केला आणि ज्येष्ठ नागरिकांना मंदिरात जाणे सुलभ व्हावे यासाठी वाहनांची विशेष व्यवस्थाही केली. ही कामे आम्ही करीत आहोत, असे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी पत्रकार परीषदेत सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स