ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
रोटरी क्लब ऑफ बांदा आयोजित भव्य पर्यावरण पूरक आकाश कंदील स्पर्धा रोटरी क्लब अध्यक्ष श्री प्रमोद कामत यांनी पत्रकार परिषद केले जाहीर
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

रोटरी क्लब ऑफ बांदा आयोजित भव्य पर्यावरण पूरक आकाश कंदील स्पर्धा रोटरी क्लब अध्यक्ष श्री प्रमोद कामत यांनी पत्रकार परिषद केले जाहीर

प्रकाशन: 07 Nov 2023 05:00 PM
वाचन संख्या 44

बांदा /राकेश परब: दिवाळी सणाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ बांदा आयोजित भव्य पर्यावरण पूरक आकाश कंदील स्पर्धा बांदा येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये रोटरी क्लब ऑफ बांदा अध्यक्ष प्रमोद कामत यांनी दिली. ही स्पर्धा मंगळवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार ते साडेआठ या वेळेत विठ्ठल रुक्माई मंगल कार्यालय, बांदा येथील सभागृहात घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रुपये पाच हजार व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रुपये 3000 व आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक रुपये http://localhost/news/public/uploads/2000 व आकर्षक चषक देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी खालील प्रमाणे नियम ठेवण्यात आले आहेत आकाश कंदील पर्यावरण पूरक असावा, आकाश कंदील ची उंची जास्तीत जास्त तीन फुटापर्यंत असावी, प्लास्टिक आणि थर्माकोलचे इतर प्रकारचे आकाश कंदील स्पर्धेत ग्राह्य धरले जाणार नाहीत, ही स्पर्धा सर्वांसाठी खुली राहील, या स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धकांना भाग घ्यावयाचा आहे त्यांनी बाबा काणेकर 9823661133, आबा धारगळकर 9422388248, स्वप्निल धामापूरकर 9423302187, त्यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेतील आकाश कंदीलला बल्ब लावण्यासाठी स्वतः सर्व साहित्य, बल्ब घेऊन यावे. स्पर्धकांना वीज कनेक्शन देण्यात येईल. त्याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी. स्पर्धा संपल्यानंतर सायंकाळी उशिरा स्पर्धेचे परीक्षण व बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकानी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ बांदा अध्यक्ष प्रमोद कामत, माजी अध्यक्ष मंदार कल्याणकर, सेक्रेटरी बाबा काणेकर, खजिनदार शिवानंद भिडे यांनी केले आहे.

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स