दसरा मेळाव्याहून परतणार्या तीन बस गाड्यांचा विचित्र अपघात ; ७ जण जखमी.
ब्यूरो न्यूज | मुंबई : काल २४ ऑक्टोबरचा आझाद मैदानावरील दसरा मेळावा संपल्यावर परतणार्या कार्यकर्त्यांच्या तीन बस गाड्यांचा विचित्र अपघात झाला. मुंबई – आग्रा महामार्गावर शहापूर जवळ हा अपघात झाला. या अपघातात ७ जण जखमी झाले आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिल्लोड सोयगांव विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते काल आझाद मैदानावर दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी गेले होते. मेळावा आटोपून परत येताना त्यांच्या बसची आणि ट्रकची धडक झाली. त्यानंतर मागून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या इतर दोन बसेसही एकमेकांवर धडकल्या. यात ट्रक आणि एक बस थेट उड्डाणपुलावरील साईड डिव्हायडर तोडून उड्डाणपुलाखालील रस्त्यावर कोसळल्या तर इतर दोन बसचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. रस्त्यावर काचांचा खच पडला आहे. या विचित्र अपघातात ७ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून काहींना गंभीर इजाही पोहोचली आहे. पोलीस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले व मदतकार्य सुरु केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)