ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सीआरझेड मध्ये स्थानिक रहिवाशांना घर बांधणे झाले सोपे ; भाजप मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी माहिती देत राज्य व केंद्र सरकारचे मानले आभार.

सीआरझेड मध्ये स्थानिक रहिवाशांना घर बांधणे झाले सोपे ; भाजप मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी माहिती देत राज्य व केंद्र सरकारचे मानले आभार.

प्रकाशन: 21 Oct 2023 11:41 AM
वाचन संख्या 262

मालवण | सुयोग पंडित : भाजप मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे केंद्र व राज्य सरकारचे ‘सीआरझेड’ संदर्भातील निर्णयाबद्दल आभार मानले आहेत. रविकिरण तोरसकर यांनी त्यांच्या प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे की भारतातील समुद्रकिनारी तसेच खाडीकिनारी कोस्टल रेग्युलेशन झोन झोन अर्थात सीआरझेड हा कायदा लागू होतो. सदरच्या कायद्या अंतर्गत बांधकामे, प्रकल्प, तसेच इतर उपक्रम यासंदर्भात नियमावली बनवली आहे. १९८१ साली बनलेल्या या कायद्यामध्ये वेळोवेळी बदल झाले आहेत. नुकताच सरकारने सीआरझेड क्षेत्रातील बांधकामा संदर्भात मर्यादा ५० मीटर पर्यंत कमी केल्याचे जाहीर केली आहे . समुद्र किनारपट्टी अथवा खाडी पासून पर्यंत पाचशे मीटर पर्यंत कोणतेही बांधकाम अथवा उद्योग करावयाचा असेल तर राज्य व केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाचा ना हरकत दाखला आवश्यक होती. ही प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ आणि किचकट होती. विविध मच्छीमार संघटना ,सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी यांनी यासंदर्भात सरकारकडे प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टिकोनातून मागणी केली होती. सर्व स्तरांतून होणाऱ्या मागणीचा सरकारने सकारात्मक विचार करून किनारपट्टी भागात अथवा सीआरझेड क्षेत्रात येणाऱ्या रहिवाशांसाठी मोठा निर्णय घेतला आहे .

महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (MCZMA) यांनी दिनांक १८ ऑक्टोबर २०२३ रोजी काढण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये(MCZMA-2023/CR-53T.C.-4) ३०० वर्ग मीटर म्हणजेच सुमारे ३१०० स्क्वेअर फूट एवढ्या क्षेत्राचे बांधकाम परवानगी ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामपंचायत, नगरपालिका यांच्याकडे दिलेली आहे.

हा केंद्र व राज्य सरकारचा निर्णय हा मच्छीमार तसेच किनारपट्टी अथवा सीआरझेड क्षेत्रामध्ये राहणाऱ्या समुदाय यांच्यासाठी दिलासादायक आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांना घर बांधणे सोपे झाले आहे. राज्य व केंद्र सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत. सदरच्या निर्णयामुळे किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. तसेच लोकांच्या बांधकाम आणि पर्यटन व्यवसायातील अडचणी सुटतील अशी आशा व्यक्त करीत राज्य व केंद्र सरकारचे आभार मानत आहोत असे भाजप मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी नमूद केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 438

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स