पळसंबच्या श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळाची मासिक सभा संपन्न ; 'नवरात्रोत्सव २०२३' ची रूपरेषा ठरली.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब यांची श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळाची मासिक सभा संपन्न काल ११ ऑक्टोबरला मंडळाचे अध्यक्ष श्री उल्हास सावंत यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. या सभेत मंडळाचे सचिव व माजी सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांनी जमा खर्चाचे वाचन केले. तसेच मंडळाचे उपाध्यक्ष श्री. अमरेश पुजारे, खजिनदार वैभव परब यांनी पळसंब गावामधील प्रत्येक कुटुंबातील एक तरी व्यक्ती आजिव सभासद किंवा सर्वसाधारण सभासद होणे अत्यावशक आहे तसेच निधी संकलनासाठी प्रयत्न करून सर्वांनाच गांवाच्या हितासाठी एकसंघ आणुया असे मनोगत मांडले. अध्यक्ष श्री उल्हास सावंत यांनी पळसंब स्मशान भूमी येथे स्वच्छता मोहिमेचा विषय मांडला. त्याला सर्वानुमते प्रोत्साहन देत १४ ऑक्टोबरला स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. मंडळाचे आजिव सभासद श्री. गिरीधर पुजारे व श्री. गणेश परब यांनी केलेल्या मार्गदर्शनपर सूचनांद्वारे पुढील वाटचाल ठरविण्यात आली.
यावेळी श्री. आई जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थानच्या नवरात्र उत्सव कार्यक्रमानिमित्त खास महिलांसाठी व मुला , मुलींसाठी विविध कार्यक्रमांचे नियोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले. यात १७ ऑक्टोबरला गांवातील महिलांसाठी ( संगित खुर्ची ) त्यात प्रथम , द्वितीय, तृतीय क्रमांक काढण्यात येणार आहेत.
१८ ऑक्टोबरला गांवातील महिलांसाठी ( बकेट मध्ये चेंडू फेकणे ) त्यात प्रथम , द्वितीय, तृतीय क्रमांक काढण्यात येणार आहे. १९ ऑक्टोबरला गांवातील मुलीसाठी ( रांगोळी स्पर्धा )त्यात प्रथम , द्वितीय , तृतीय क्रमांक काढण्यात येणार आहे. २० ऑक्टोबरला पळसंब गावातील लहान मुलांसाठी (फॅन्सीड्रेस स्पर्धा ) यात प्रथम , द्वितीय , तृतीय क्रमांक काढण्यात येणार आहे. २२ऑक्टोबरला पळसंब गांवातील महिलांसाठी ( हात बांधुन चंडू गोळा करणे स्पर्धा ) त्यात प्रथम, द्वितीय , तृतीय क्रमांक काढण्यात येणार आहे
२३ ऑक्टोबरला पळसंब गावातील महिलांसाठी ( चुरमुरे वाटाण्याचा खेळ स्पर्धा ) त्यात प्रथम , द्वितीय , तृतीय क्रमांक काढण्यात येणार आहे. २३ ऑक्टोबरला पळसंबमधील मुला, मुलींसाठी ( तळ्यात मळ्यात स्पर्धा ) त्यात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक काढण्यात येणार आहे.
या सर्व स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी मंडळाचे सदस्य श्री. अक्षय परब : ९४०५७९६१३३ व अमित पुजारे : ९४२९४०५९१४ यांच्याशी संपर्क साधून नांव नोंदणी करावी असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच गांवातील दानशूर व्यक्तींना किंवा राजकीय पक्षांना, संघटनांना या कार्यक्रमासाठी चषक किंवा रोख रक्कम द्यायची असल्यास मंडळाचे अध्यक्ष श्री. उल्हास सावंत ९४२१२६२९८७ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.
या सभेत रोशन नामदेव चिंचवलकर ( पळसंब, गांवठणवाडी) यांची श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळाचे मुंबईत प्रचार , प्रसार, मुंबईतील कामकाज पाहण्यासाठी मंडळाच्या ठरावाने तसेच सर्वांच्या एकमताने निमंत्रित सदस्य म्हणून सभासद नोंदणी करण्यात आली. त्यावेळी अध्यक्ष श्री. उल्हास सावंत, उपाध्यक्ष श्री.अमरेश पुजारे, सचिव श्री. चंद्रकांत गोलतकर, खजिनदार श्री. वैभव परब सभासद श्री. अमित पुजारे , शेखर पुजारे , अक्षय परब, उपस्थित होते. सभेच्या समारोपाला नवीन सभासदांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)