ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वन्यजीवांच्या संरक्षणासाठी जल, जमीन आणि जंगल आवश्यक आहे ; श्री गजानन शेट्ये.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वन्यजीवांच्या संरक्षणासाठी जल, जमीन आणि जंगल आवश्यक आहे ; श्री गजानन शेट्ये.

प्रकाशन: 09 Oct 2023 09:25 AM
वाचन संख्या 157

गोगटे वाळके महाविद्यालय, बांदा व रानजाई निसर्ग मंडळाच्या वतीने ‘वन्यजीव सप्ताहा’च्या निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथील गोगटे वाळके महाविद्यालय व रानजाई निसर्ग मंडळाच्या वतीने ‘वन्यजीव सप्ताहा’च्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दोडामार्ग येथील पर्यावरण मित्र श्री गजानन शेट्ये उपस्थित होते. “वन्यजीवांच्या संरक्षणासाठी जल ,जमीन आणि जंगल यांची आवश्यकता आहे त्यासाठी या तिन्ही गोष्टींचे संवर्धन ही काळाची गरज आहे”, असे उद्गार शेटये यांनी काढले. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जैवविविधतेबाबत कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना चित्रफितीमार्फत मार्गदर्शन केले. उत्कृष्ट ‘निसर्ग तज्ञ तथा प्रेमी’ पुरस्कार प्राप्त श्री प्रवीण सातोसकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय दिला व मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत रानजाई निसर्ग मंडळाचे समन्वयक प्रा. शरद शिरोडकर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना प्रा. डॉ. एस. पी. वेल्हाळ यांनी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे असे म्हटले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रश्मी काजरेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारी गार्गी विर्नोडकर यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग आणि कर्मचारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स