ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सावंतवाडीतील रहिवासी संकुलात आग ; धुराच्या लोटांत अनेक कुटुंबे अडकलेल्यांची केली गेली सुटका ; सुदैवाने जीवीतहानी नाही.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सावंतवाडीतील रहिवासी संकुलात आग ; धुराच्या लोटांत अनेक कुटुंबे अडकलेल्यांची केली गेली सुटका ; सुदैवाने जीवीतहानी नाही.

प्रकाशन: 09 Oct 2023 06:43 AM
वाचन संख्या 265

सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरातल्या खासकीलवाडा परिसरातील लक्ष्मी नगर येथे असलेल्या भाग्यलक्ष्मी एम्पायर या संकुला मधील वीज मीटरांना शॉर्टसर्किटने आग लागली. त्यामुळे बिल्डिंगमध्ये राहणारी २५ हून अधिक कुटुंबे धुरात अडकली. त्यात एक महिला अत्यवस्थ झाली. ही घटना आज रात्री १० :२० वाजण्याच्या दरम्यान घडली. पालिकेचा अग्निशामक बंब व नागरिकांनी पुढाकार घेवून धुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे सोशल मीडियाचे पदाधिकारी सचिन पाटकर यांनी दिली. तासाभरातच आग आटोक्यात आणण्यात यश आले. कोणी जखमी नाही, असे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी की, लक्ष्मीनगर येथे असलेल्या भाग्यलक्ष्मी एम्पायरमध्ये असलेले वीज मीटरांनी १०:२० वाजण्याच्या दरम्यान अचानक पेट घेतला. यावेळी काही क्षणात बिल्डिंगमध्ये पूर्णता धुरांचे लोट पसरले. नेमके काय झाले, याची काहीच कल्पना तेथील रहिवाशांना नव्हती. त्यामुळे आरडाओरड सुरू झाली. अशा परिस्थितीत काही लोकांनी बिल्डिंगच्या तळमजल्यावर आग लागली अशी ओरड केली. त्यामुळे तेथे अडकलेली कुटुंबे टेरेसवर जाऊन राहिली काही वेळाने त्या ठिकाणी पालिकेच्या बंबाला बोलवण्यात करण्यात आले. बंबाचे कर्मचारी अमोल शितोळे व सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी तात्काळ धाव घेतली. त्यानंतर त्यांच्यासह नागरिकांच्या मदतीने आग विझवण्यासाठी आली. त्यानं टेरेसवर अडकलेल्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी खाली
हलवण्यात आले. काही वेळाने बोलण्यात धुराचे लोट कमी झाले. दरम्यान या धुरामुळे महिला अत्यवस्थ झाली. तिला रवी जाधव यांनी अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान राष्ट्रवादीचे पदाधिकारी सचिन पाटकर, सावली पाटकर, डॉ. प्रवीण कुमार ठाकरे आदी नागरिकांनी त्या ठिकाणी जमून आज विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. याबाबत सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी संपर्क साधून ब्रेकिंग मालवणीला माहिती दिली. ते म्हणाले, आग लागली असली तरी वीज मीटरचे नुकसान झाले आहे. त्या ठिकाणी वीज कंपनीचे कर्मचारी अधिकारी येऊन काम करत आहेत. मोठे नुकसान झालेले नाही. सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. सुदैवाने कोणी या जखमी झालेले नाही किंवा जीवीतहानी झालेली नाही.

(फोटो सौजन्य | सावंतवाडी ब्यूरो )

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स