ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मराठी पत्रकार परिषदेने राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाईंच्या पत्रकार परिषदांवर घातला बहिष्कार ; पत्रकारांशी सतत अरेरावीच्या भाषेत बोलल्याने घेतला निर्णय.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मराठी पत्रकार परिषदेने राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाईंच्या पत्रकार परिषदांवर घातला बहिष्कार ; पत्रकारांशी सतत अरेरावीच्या भाषेत बोलल्याने घेतला निर्णय.

प्रकाशन: 08 Oct 2023 11:34 AM
वाचन संख्या 156

सातारा | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाईंच्या राज्यभरातील पत्रकार परिषदांवर मराठी पत्रकार परीषदेने बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
“माझेच खरे…, मी सांगेन तीच पूर्व…, मी मंत्री आहे…माझ्या अधिकारात काय करायचे ते करेन, तुमच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला मी बांधील नाही”, अशी अलीकडील काळात पत्रकारांशी सतत अरेरावीची भाषा केल्याने बहिष्कार घालण्याचा निर्णय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने घेतल्याचे स्पष्ट केले गेले आहे.

कोणत्याही प्रश्नाची माहिती न घेता पत्रकार परिषदेत पत्रकारांनाच “तुमचा प्रश्न अपुऱया माहितीच्या आधारे आहे”, असा एकतर्फी निवाडा करण्याचा तसेच “तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधिल नाहीच”, असे उत्तर देण्याचा प्रकार शंभुराज देसाई यांच्याकडून सातत्याने होत आहे. जर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास ते बांधिल नसतील तर त्याच्या पत्रकार परिषदेला जाण्यासाठी पत्रकारही बांधील नाहीत, अशी भूमिका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने घेण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरात त्यांच्या देसाई यांच्या पत्रकार परिषदांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला सर्व संघटनांचाही पाठिंबा आहे.

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, किरण नाईक, परिषदेचे राज्य अध्यक्ष शरद पाबळे यांच्या सूचनेनुसार परिषदेचे राज्याचे उपाध्यक्ष शरद काटकर, सातारा जिल्हाध्यक्ष हरीश पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, दीपक प्रभावळकर, दीपक शिंदे, सुजित आंबेकर, राज्य महिला सरचिटणीस विद्या म्हासुर्णेकर, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक राहुल तपासे, शंकर मोहिते, डिजिटल मीडिया राज्य उपाध्यक्ष सनी शिंदे, दत्ता मर्ढेकर, तुषार भद्रे, मराठी पत्रकार परिषद संलग्न सातारा जिल्हा पत्रकार संघ, सातारा पत्रकार संघ, इलेक्ट्रॉनिक मीडिया संघ, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, डिजिटल मीडिया परिषद व इतर ११ तालुक्यांच्या पत्रकार संघ यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 453

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स