सावंतवाडी वन विभागातर्फे आयोजीत वन्यजीव व पर्यावरण संरक्षण सप्ताह ; पर्यावरण अभ्यासक नवीद हेरेकर यांनी केले विशेष मार्गदर्शन.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी वनविभागा तर्फे आयोजीत वन्यजीव व पर्यावरण संरक्षण सप्ताह अंतर्गत काल पर्यावरण अभ्यासक व शिक्षक नवीद हेरेकर यांनी विशेष मार्गदर्शन केले. या मध्ये नवीद हेरेकर यांनी सापांविषयी माहिती, त्यांच्या बद्दल लोकांमध्ये असलेले गैरसमज व अंधश्रद्धा यांवर शास्त्रोक्त माहिती दिली.
या दरम्यान नवीद हेरेकर यांचा इयत्ता दुसरीत शिकत असलेला मुलगा कु. कबीर हेरेकर याने प्लास्टीक व पर्यावरण नुकसान या विषयावर माहिती देत व प्लास्टीकच्या पुनर्वापरावर त्याने अभ्यासलेली माहिती दिली.
वनविभागाने नवीद हेरेकर यांच्या विशेष मार्गदर्शनाबद्दल आभार व्यक्त केले व कु. कबीरच्या पुढील पर्यावरण अभ्यासविषयक वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्याची प्रशंसा केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)