चिंदरचे माजी सरपंच रामचंद्र खोत कालवश.
आचरा | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चिंदर सडेवाडी येथील रहिवासी व चिंदर गांवचे माजी सरपंच, सेवानिवृत्त पोस्ट कर्मचारी, खारभूमी सोसायटी माजी चेअरमन श्री. रामचंद्र आत्माराम खोत यांचे ६ ऑक्टोबरला वार्धक्याने राहत्या निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. जुन्या पिढीतील एक समाजाभिमुख व्यक्ती म्हणून त्यांचा परीचय होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सूना नातवंडे असा मोठा परिवार आहे. व्यावसायिक किशोर खोत यांचे ते वडिल तर सामाजिक कार्यकर्ते बाळा पाटणकर यांचे ते सासरे होत. त्यांच्या निधनाने आचरा व चिंदर परिसरात शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)