ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
उद्या शरद कृषी भवनात  विश्वकर्मा कौशल सन्मान योजना मेळाव्याचे आयोजन ; अनेक समाज बांधवांची उपस्थिती असणार अशी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री यांची माहिती.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

उद्या शरद कृषी भवनात विश्वकर्मा कौशल सन्मान योजना मेळाव्याचे आयोजन ; अनेक समाज बांधवांची उपस्थिती असणार अशी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री यांची माहिती.

प्रकाशन: 04 Oct 2023 02:53 PM
वाचन संख्या 307

बहुसंख्य १२ बलुतेदारही रहाणार उपस्थित.

आचरा | प्रतिनिधी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पुढाकाराने उद्या ५ ऑक्टोबरला शरद कृषी भवन, ओरोस येथे विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला जिल्ह्यातील जास्तीत जास्त विविध क्षेत्रातील कारागीर उपस्थित राहण्यासाठी भाजपा कार्यालय ओरोस येथे आज सिंधुदुर्ग जिल्हा विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाजाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा ओबिसी सेल जिल्हाध्यक्ष आनंद मेस्री यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन बैठक पार पडली. या बैठकीला प्रत्येक तालुक्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. मेळाव्याला बहुसंख्य बाराबलुतेदार उपस्थित राहतील अशी माहिती आनंद मेस्री यांनी दिली.

देशातील सुतार, कुंभार, धोबी, नाभिक, मुर्तिकार, शिल्पकार अशा बारा बलुतेदारांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. देशातील ३० लाख कारागीरांचे नशीब पी एम विश्वकर्मा योजनेमुळे बदलेल. केंद्रीय मंत्रिमंडळाने नविन विश्वकर्मा योजनेला मंजुरी देऊन १३ हजार कोटी ची तरतूद केली आहे. त्यामुळे त्याचा फायदा पारंपरिक कारागीरांना होणार आहे. विश्वकर्मा योजनेचा उद्देश कौशल प्रशिक्षण, तंत्रज्ञान आणि आर्थिक सहाय्य देऊन देशभरातील कारागिर व कारागिरांच्या क्षमता वाढविणे हा आहे. या योजने अंतर्गत कुशल कारागीरांना एम एस एम ई म्हणजेच सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाशी जोडले जाणार आहे. त्यामुळे त्यांना खात्रीची आणि मोठी बाजारपेठ मिळणार आहे.

या बैठकीला सुतार समाज नेते प्रकाश मेस्त्री, कृष्णा मेस्त्री, राजू मेस्त्री, महेश मेस्त्री बाळकृष्ण मेस्त्री, विठोबा सुतार, रितेश सुतार, नारायण सुतार, शंकर मेस्त्री, रामदास मेस्त्री, मधुसूदन मेस्त्री, सोमा मेस्त्री, अंकुश मेस्त्री, रामचंद्र मेस्त्री, शेखर मेस्त्री, विजय मेस्त्री आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स