बांदा येथील पत्रकार व कौशल्य विकास शिक्षक श्री. राकेश परब 'विद्यार्थी मित्र' पुरस्काराने सन्मानित.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथील समाजातील व्यक्तिमत्व तथा पत्रकार व आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे बांदा प्रतिनिधी श्री. राकेश परब यांना नुकताच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग विभाग या संस्थेच्या वतीने ‘विदयार्थी मित्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कुडाळ येथील मराठा हॉल मध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमात राकेश परब यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान संपन्न झाला.
राकेश परब हे पत्रकारितेसोबतच पर्यावरण,क्रीडा, कौशल्य शिक्षण व कलेच्या क्षेत्रात गेली दोन दशके कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाची सर्व स्तरांतून व आपली सिंधुनगरी चॅनल समूहात प्रशंसा होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)