मडुरा येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या ‘श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट संचालित येथील व्ही एन बाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल, मडूरा’ येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका निती साळगावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले त्यानंतर इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांबद्दल माहिती सांगितली. मुख्याध्यापिका निती साळगांवकर यांनी लालबहादूर शास्त्री याबद्दल मार्गदर्शन केले तर सौ. प्रतीक्षा शिरोडकर यांनी महात्मा गांधीजींबद्दल माहिती सांगितली. सूत्रसंचालन वेलांकनी रॉड्रिक्स तर आभार प्राची परब यांनी मानले.
यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका नीती साळगांवकर, सहशिक्षिका प्रतीक्षा शिरोडकर, वेलांकनी रॉड्रिक्स, तेजस्वी गावडे, प्राची परब उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)