तारकर्ली गांवातील बाळगोपाळांचा 'सेवेचा पंचकार..!'
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या तारकर्ली गांवच्या बाळ गोपाळांनी भजनातून मिळालेल्या रक्कम गरजूंना देत सलग पाचव्या वर्षी असा उपक्रम राबविण्याचा ‘सेवेचा पंचकार’ साधला आहे.
तारकर्ली गावातील कु. रोहन नरेश कांदळगांवकर , कु. यज्ञेश वंदन केरकर , कु.वेदांत सदाशिव सागवेकर , कु. ईशान सदाशीव सागवेकर ,कु . प्रणित भार्गव कांदळगावकर , कु. निनाद गणपत मोंडकर , कु. रिषभ श्रीधर खराडे , कु . हार्दिक सतिश टिकम , कु. नैतिक धोंडी कांदळगावकर , कु . रोहित बाळकृष्ण वरक कु . देवेश सीताराम पराडकर, कु. भुवन नरेंद्र नागवेकर, कु आर्यन चंद्रशेखर कुबल व कु. ओम प्रताप खराडे या बाळगोपाळांनी गणेशोत्सवा दरम्यान आपल्या बालभजन मंडळा मार्फत गणेश भजन करून त्यातुन गोळा झालेल्या निधीतील ४००० रुपयांचा निधी श्रीमती मालिनी चंद्रकांत धुरत आणि त्यांचा मुलगा श्री. अविनाश चंद्रकांत धुरत या आजारपणाने त्रस्त असलेल्या कुटुंबाला मदत म्हणुन दिला .त्यामुळे या कुटुंबाचा आर्थिक भार काही प्रमाणात हलका झाला आहे .यापुर्वी सुद्धा या बाळगोपाळांनी गावातील निराधार आणी गरजु व्यक्तींना आर्थिक मदत केली होती. या कामासाठी त्यांना नवी मुंबई येथील साईवेद स्पोर्ट्सचे संचालक श्री. संजय तारी यांनी मोफत जर्सी उपलब्ध करून दिली होती. सौदी अरेबिया येथे वास्तव्यास असलेल्या श्री . प्रदिप तोंडवळकर यांनी ५००० रूपयांचे प्रोत्साहनात्मक बक्षिस पाठवले होते. बाळगोपाळांच्या या उपक्रमाची मालवण तालुका व मुंबईस्थित कोकणवासीयांनी प्रशंसा केली आहे.
तारकर्लीच्या बाळगोपाळांनी या सेवा पंचकारातून पुन्हा एकदा सिद्ध केले की ‘सेवा इच्छुकाला वय नसते….!’
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)