ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
अफ़जल ख़ान वधाची 'इतिहास साक्षी' छत्रपती शिवरायांची वाघनखे प्रदर्शनासाठी महाराष्ट्रात..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

अफ़जल ख़ान वधाची 'इतिहास साक्षी' छत्रपती शिवरायांची वाघनखे प्रदर्शनासाठी महाराष्ट्रात..!

प्रकाशन: 01 Oct 2023 07:56 AM
वाचन संख्या 202

मुंबई | ब्युरो न्यूज : तमाम मराठी माणसे तसेच शिवप्रेमींसाठी एक इतिहास साक्षाच्या ‘दर्शनाची’ वार्ता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनवरुन परत आणण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. येत्या नोव्हेंबर महिन्याच्या १६ तारखेला महाराजांची वाघनखे मुंबईत आणली जाणार आहे.
महाराष्ट्रातील शिवप्रेमींसाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे. राज्य सरकार ३ ऑक्टोबर रोजी लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयासोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखे भारतात आणण्याबद्दल करार करणार आहे.

या करारानंतर पुढील ३ वर्षांसाठी वाघनखे महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी याच वाघनखांच्या सहायाने अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. तिच वाघनखे भारतात आणून येथील जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.

दरम्यान, ही वाघनखे महाराष्ट्रात आणल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सोबत राहतील. महाराष्ट्रात वाघनखे येताच एक मोठा सोहळा आयोजित केला जाणार असल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी माध्यमांना दिली.

या वाघनखांचा प्रवास खालील प्रमाणे असेल.
१६ नोव्हेंबरला शिवरायांच्या वाघनखांचे मुंबईत आगमन.
१७ नोव्हेंबरला सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात वाघनखांची स्थापना.१७ नोव्हेंबर २०२३ ते २४ ऑगस्ट २०२४ दरम्यान वाघनखे सातारा येथेच प्रदर्शनासाठी ठेवली जातील.
१५ ऑगस्ट २०२४ ते एप्रिल २०२५ पर्यंत वाघनखे नागपूर येथील शासकीय संग्रहालयात ठेवली जातील. एप्रिल २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या काळात वाघनखं कोल्हापूर येथील शासकीय संग्रहालयात ठेवली जातील. नोव्हेंबर २०२५ ते नोव्हेंबर २०२६ दरम्यान वाघनखे मुंबईतील छ्त्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवली जातील. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी वाघनखे पुन्हा लंडनला व्हिक्टोरिया आणि गिल्बर्ट वस्तुसंग्रहालयात पाठवली जातील.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स