ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
मसुरेतील ज्येष्ठ काँग्रेस नेते तुकाराम मेस्त्री कालवश.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मसुरेतील ज्येष्ठ काँग्रेस नेते तुकाराम मेस्त्री कालवश.

प्रकाशन: 22 Sep 2023 04:36 PM
वाचन संख्या 209

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे चांदेर मायनेवाडी येथील ज्येष्ठ समाजसेवक तसेच जुन्या काळातील काँग्रेसचे जेष्ठ नेते, जेष्ठ गणेश मूर्तिकार, ज्येष्ठ भजनी बुवा तुकाराम विठ्ठल मेस्त्री वय ९२ वर्षे यांचे नुकतेच वार्धक्याने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

तुकाराम मेस्त्री यांच्या निधनामुळे मसुरे गांवावरती शोककळा पसरली आहे. तुकाराम मेत्री जुन्या काळातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांचा मोठा नावलौकिक होता माजी मंत्री स्वर्गीय बापूसाहेब प्रभूगांवकर, माजी मंत्री स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्यासोबत त्यांनी काँग्रेसची धुरा हाती घेतली होती. त्यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते आणि यातूनच त्यांनी गांवातील विविध प्रश्न सोडविले होते. त्या काळातील शासकीय ठेकेदार म्हणून त्यांचे सुप्रसिद्ध नांव होते. जिल्ह्यामध्ये अनेक रस्ते, अनेक पुलांची कामे त्यांनी केली होती. डंपर व्यवसायातून त्यांनी अनेक जणांना रोजगार मिळवून दिला होता.

मसुरे गांवात ते ज्येष्ठ भजनी बुवा तसेच ज्येष्ठ गणेश मूर्तिकार म्हणून प्रसिद्ध होते. संगीत क्षेत्रात त्यांचे मोठे ज्ञान होते. मृदुंग, तबला, पेटी, ताशा, चकवा, टाळ ही वाद्ये वाजविण्यात ते माहीर होते आणि ते उत्कृष्ट चित्रकारही होते. दशावतार क्षेत्राचा त्यांचा मोठा गाढा अभ्यास होता. अनेक दशावतार कलाकार त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत होते. गावांतील सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, राजकारणात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांचे सुतार काम हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध होते.

गणपती विसर्जना दरम्यान त्यांची गाऱ्हाणी ही ह्रदयस्पर्शी असायची असे त्यांना जाणणारे सांगतात. गांवातील गोरगरीब जनतेचे ते कैवारी होते. अनेक गरीब गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी वेळोवेळी मदतीचा हात दिला होता. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार असून येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल मेस्त्री, गुरुप्रसाद मेस्त्री तसेच प्रसिद्ध दशावतार मृदुंग वादक अनिल मेस्त्री यांचे ते वडिल आणि प्रसिद्ध आर्टिस्ट दत्तप्रसाद मेस्त्री, संदीप मेस्त्री यांचे ते आजोबा होत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स