महानात आढळला खापरखवल्या ; सर्पमित्र स्वप्निल परुळेकर यांनी तो सर्प बिनविषारी असल्याचा केला शास्त्रीय खुलासा.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या महान येथील दत्ताराम पांडुरंग घाडी यांच्या घराशेजारी ‘खापरखवल्या’ या प्रजातीच्या सर्प आढळून आला.
कांदळगांवचे सर्पमित्र स्वप्नील परुळेकर यांनी सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.
खापरखवल्या याचे इंग्रजी नांव ‘शिल्डटेल’ असे आहे. शेपटीवर खाप मारल्याप्रमाणे रचना असल्याने या सापाचे असे नांव आहे. हा साप बिनविषारी प्रजाती मधील दुर्मिळ असल्याची माहिती परुळेकर यांनी दिली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)