बांदा गांव महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी संदेश पावसकर यांची एकमताने निवड.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा गांवच्या ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी येथील व्यापारी संदेश पावसकर यांची एकमताने निवड करण्यात आली तर पत्रकार प्रतिनिधी म्हणून निलेश मोरजकर यांची निवड करण्यात आली.
या निवडीनंतर माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गुरुनाथ सावंत यांच्या हस्ते संदेश पावसकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी बांदा सरपंच प्रियांका नाईक, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष अन्वर खान, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, सौ. रुपाली शिरसाट, राजाराम उर्फ बाळू सावंत, रत्नाकर आगलावे, आबा धारगळकर, देवल येडवे, शामसुंदर मांजरेकर, रिया येडवे, शिल्पा परब, तनुजा वराडकर, दीपलक्ष्मी पटेकर, शामसुंदर मांजरेकर, प्रशांत बांदेकर, भाऊ वाळके, निखिल मयेकर, ग्रामविस्तार अधिकारी लीला मोर्ये यांच्यासह शहरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...