भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये हिंदी भाषा दिन साजरा.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल, मसुरे या प्रशालेमध्ये हिंदी भाषा दिन साजरा करण्यात आला. हिंदी भाषा दिनाचे औचित्य साधून शालेय परिपाठ हिंदी भाषे मधून सादर करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी परिपाठामध्ये सहभागी होत सादरीकरण केले.
याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक किशोर देऊलकर यांनी हिंदी भाषा दिनाचे महत्त्व सांगितले. यावेळी शिक्षिका पार्वती कोदे, संजना प्रभुगांवकर, सायली म्हाडगुत, संतोषी मांजरेकर ,समीर गोसावी, स्वरांजली ठाकूर, रसिका मेस्त्री, सविता मेस्त्री , रेश्मा बोरकर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)