मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना ; चार्टर्ड विमानाचे कोसळून दोन तुकडे..!
ब्यूरो न्यूज | मुंबई : मुंबईत आज संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे. लिअरजेटचे एक विमान अचानक धावपट्टीवरून घसरले. त्यानंतर या विमानाने पेटही घेतला. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
वायझॅग ( विशाखापट्टणम) ते मुंबई हे लिअरजेटचे विमान मुंबईत मुसळधार पावसामुळे धावपट्टीवरून घसरले. या विमानात एकूण ६प्रवासी आणि २ कर्मचारी होते. त्यावेळी दृश्यता ७०० मीटर होती. घाटकोपर-कुर्ला दरम्यान असलेल्या मुख्य धावपट्टीवर ही घटना घडली. सध्या दोन्ही धावपट्ट्या बंद करण्यात आल्या आहेत.
डिजिसीएने दिलेल्या माहितीनुसार, VSR Ventures Learjet 45 विमान VT-DBL विशाखापट्टणमहून मुंबईला उड्डाण करत मुंबई विमानतळावर धावपट्टी क्र.२७ वर लँडिंग करताना धावपट्टीवर कोसळले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)