ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
सावंतवाडी पाडलोस मार्गे सातार्डा एसटी बसची सेवा  सुरु करण्याची महेश कुबल यांची मागणी...

सावंतवाडी पाडलोस मार्गे सातार्डा एसटी बसची सेवा सुरु करण्याची महेश कुबल यांची मागणी...

प्रकाशन: 08 Oct 2021 09:35 PM
वाचन संख्या 64

बांदा | राकेश परब : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा नुकत्याच सुरू झाल्या असून त्यास विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद आहे. गेले दिड ते दोन वर्षांपासून शाळेपासून दूर असलेली मुले शाळेत जायला आतुरतेने बाहेर पडतायत. परंतु सावंतवाडी-पाडलोस मार्गे सातार्डा या बंद असलेल्या एसटीअभावी त्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रशासनाने सदर एसटीची सेवा तात्काळ सुरू करून विद्यार्थ्यांचे खासगी वाहनांसाठी होत असलेले आर्थिक नुकसान टाळावे, अशी मागणी पाडलोस माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष महेश कुबल यांनी केली आहे.
बाजारात जाण्यासाठी सावंतवाडी-पाडलोस मार्गे सातार्डा एसटी महत्त्वाची ठरते. त्यामुळे शेतकरी  सावंतवाडी व बांदा बाजारपेठेत खरेदी-विक्री करण्यासाठी जातात तर विद्यार्थ्यांना सकाळच्या व संध्याकाळच्या सत्रात शाळेत ये-जा करण्यासाठी सदर एसटी सोयीस्कर ठरते. प्रशासनाने शाळा सुरू केल्या ही आनंदाची गोष्ट असून त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली सावंतवाडी-पाडलोस मार्गे सातार्डा एसटी बस सुरू करावी. कारण संध्याकाळच्या वेळी विद्यार्थ्यांना एसटी बस अभावी खाजगी वाहनांना पैसे देत घर गाठावे लागते परिणामी याचा अधिक भुर्दंड पालकांना सोसावा लागतो. याची दखल एसटी प्रशासनाने घेऊन विद्यार्थ्यांची प्रवासाची होत असलेली गैरसोय दूर करावी, अशी मागणी पाडलोस माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष महेश कुबल यांनी केली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स