ताज्या बातम्या
परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा. केरळच्या मुलींची महाराष्ट्रावर मात तर तेलंगणाचा उत्तर प्रदेशवर अतिरिक्त वेळेत निसटता विजय. पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन.
मसुरे कावा शाळा येथे तृणधान्य पाककृती स्पर्धेस प्रतिसाद!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मसुरे कावा शाळा येथे तृणधान्य पाककृती स्पर्धेस प्रतिसाद!

प्रकाशन: 09 Sep 2023 04:06 PM
वाचन संख्या 56

सौ.मयुरी पेडणेकर यांचा
प्रथम क्रमांक

मसुरे |प्राजक्ता पेडणेकर : मसुरे कावा शाळा येथे आयोजित तृणधान्य पाककृती स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे परीक्षण आरोग्य सेवक श्री. सिद्धेश धुरी आणि सौ.नेरूरकर यांनी केले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सौ.मयुरी मंगेश पेडणेकर, द्वितीय क्रमांक सौ.मनस्वी विरेश येसाजी, आणि तृतीय क्रमांक सौ.दिव्या दिपक कातवणकर यांचा आला.
श्री.धुरी आणि सौ.नेरूरकर यांनी आहारातील तृणधान्याचे महत्व समजावून सांगितले.प्रथम तीन क्रमांकाना,व सहभागी गृहिणींना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यशस्वी आणि सहभागी स्पर्धकांचे मुख्याध्यापिका सौ.सुखदा मेहेंदळे,
अध्यक्ष पंढरीनाथ मसुरकर, उपाध्यक्ष सावली कातवणकर, शाळा व्यवस्थापन समिती मसुरे कावा यळआणि मसुरे भंडारी समाज सेवा संघाने अभिनंदन केले आहे.मुख्याध्यापक सौ.सुखदा मेहेंदळे यांनी प्रास्ताविक तर आभार प्रशालेचे शिक्षक सुहास गावकर यांनी मानले.

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स