ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांद्यात उद्या रंगणार १ लाख ११ हजार १११ रुपयाची दहीहंडी स्पर्धा
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बांद्यात उद्या रंगणार १ लाख ११ हजार १११ रुपयाची दहीहंडी स्पर्धा

प्रकाशन: 09 Sep 2023 07:29 AM
वाचन संख्या 64

बांदा / राकेश परब :भाजप नेते माजी आमदार राजन तेली यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी स्पर्धा ही उद्या शनिवारी (ता. ९) रंगणार असून त्या पार्श्वभूमीवर बांद्यात भाजप कडून जोरदार तयारी सुरू आहे. तब्बल १ लाख ११ हजार १११ रुपयाचे पहिले बक्षीस तर दुसरे बक्षीस ५५ हजार ५५५ रुपये ठेवण्यात आले आहे. ही स्पर्धा बांदा मच्छी मार्केट पटांगण येथे सायंकाळी पाच वाजता होणार आहे.
    बांदा मच्छीमार्केट येथील भव्य पटांगणावर भाजपकडून आयोजन केलेल्या दहीहंडी उत्सव करीता भाजपची नियोजन बैठक बांदा येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात आज संपन्न झाली. बांदा मच्छी मार्केटच्या भव्य पटांगणावर ९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता भाजपकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
   दहीहंडी फोडणाऱ्या प्रथम क्रमांकाच्या संघाला एक लाख १२ हजार १११ रुपये तर द्वितीय संघाला ५५ हजार ५५५ बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच पाच थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला ५ हजार रुपये सहा थर लावणाऱ्या पथकाला ६ हजार रुपये, सात थर लावणाऱ्या पथकाला ७ हजार रुपये तर आठ थर लावणाऱ्या पथकाला ८ हजार रुपये देण्यात येणार आहेत.
   दहीहंडी उत्सवाच्या थराराचे युवा मराठी अभिनेत्री मृण्ययी देशपांडे, युवा पार्श्वगायिका कविता राम, युवा पार्श्वगायक स्वप्निल गोडबोले हे खास आकर्षण आहेत. सूत्रसंचालक म्हणून वृत्त निवेदक ऋषिकेश देसाई उपस्थित राहणार आहे. तसेच यावेळी भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
     बांद्यात प्रथमच दहीहंडी उत्सव आयोजन एवढ्या मोठय़ा प्रमाणात करण्यात आले असून यात युवकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली, युवा नेते प्रथमेश तेली यांनी केले आहे. यावेळी बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, बांदा मंडल उपाध्यक्ष उमेश पेडणेकर, सिद्धेश महाजन, अशोक सावंत, बाळा आकेरकर, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, नितेश पेडणेकर, वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, शैलेश केसरकर, तसेच बांदा शहरातील भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   यावेळी पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी मच्छिमार्केट मैदानाला भेट देत पाहणी केली व कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात राजन तेली व भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स