ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे कृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध कार्यक्रम!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे कृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध कार्यक्रम!

प्रकाशन: 07 Sep 2023 11:53 AM
वाचन संख्या 41

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : भरतगड इंग्लिश मिडियम स्कूल मसुरे या प्रशालेत कृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नर्सरी ,ज्युनिअर ,सीनियर तसेच इयत्ता पहिली ते चौथी या विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी या विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Article image

या कार्यक्रमाचे औचित्य साधून उभारण्यात आलेला कृष्ण जन्माष्टमीनिमित्त पारंपारिक देखावा कार्यक्रमाचे आकर्षण ठरला. तसेच याप्रसंगी दहीहंडी उभारण्यात आली होती. मुलांनी दहीहंडी फोडून कार्यक्रमाचा उत्साह आणखी द्विगुणीत केला.

Article image

याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक किशोर देऊलकर शिक्षिका पार्वती कोदे, गौतमी प्रभुगावकर, संजना प्रभुगावकर,सायली म्हाडगुत, संतोषी मांजरेकर ,समीर गोसावी ,स्वरांजली ठाकूर,रसिका मेस्त्री,तनुश्री नाबर, सविता मेस्त्री ,रेश्मा बोरकर तसेच कर्मचारी वसंत प्रभुगावकर, समीर सावंत,संतोष परब राघोजी परब,करुणा चव्हाण,प्रिया पाटकर यासर्वांनी मेहनत घेतली. कार्यक्रम प्रसंगी बहुसंख्येने पालक उपस्थित होते

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स