तेरा जादू..चल गया ; आमदार वैभव नाईक यांचे कांदळगांवात मोठे यश.
आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत, तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांच्या कार्यपध्दतीवर विश्वास ठेवून अनेक जणांचा पक्षप्रवेश.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यातल्या कांदळगांव येथे एक गठ्ठा पक्षप्रवेश साकार केला आहे.
मालवण तालुक्यातल्या कांदळगांव येथील कु.संतोष वरक, कु. दिपक वरक, श्री. विठोबा वरक, सौ.रूक्मिणी वरक श्री.तानाजी वरक ,सौ.लक्ष्मी वरक,श्रीमती.जनाबाई वरककु. लता वरक,कु. सुनिल वरक, सौ.विनया बावदाणे, श्री.बबन झोरे, श्री .शाहु वरक, सौ.राजश्री झोरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.
कांदळगांव सरपंच रणजित परब, विकास आचरेकर, बाबली कांदळगांवकर, नितीन परब, अमोल परब, विभाग प्रमुख राजेश गांवकर यांनी संपूर्ण पक्ष प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर व नेते व मालवण नगरपरिषद माजी बांधकाम सभापती व माजी नगरसेवक मंदार केणी, विभाग प्रमुख समीर लब्दे, संघटक चंद्रकांत गोलतकर तसेच आचरा व मसुरे विभागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ग्रासरुटवरील हे यश तालुका स्त्तरावर उल्लेखनीय असल्याची प्रतिक्रिया राजकीय तज्ञांनी दिली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)