ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
ओटव नांदगाव प्रशालेच्या विध्यार्थ्यांची  वर्षा सहल उत्साहात!

ओटव नांदगाव प्रशालेच्या विध्यार्थ्यांची वर्षा सहल उत्साहात!

प्रकाशन: 03 Sep 2023 01:24 PM
वाचन संख्या 61

मसुरे | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा ओटव नांदगाव या प्रशालेची वर्षा सहल वैभववाडी तालुक्यातील नापणे या ठिकाणी काढण्यात आली होती. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांनी सहलीचा आनंद घेतला.यावेळी केंद्रप्रमुख सद्गुरु कुबल , मुख्याध्यापक आनंद तांबे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष परब मॅडम, उपशिक्षिका रूपाली मॅडम, राजश्री धुमाळ ,प्राची गोसावी, लक्ष्मी मांजरेकर, रुपेश नांदगावकर आदी पालक उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असणारी विविध पर्यटन स्थळांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून अशा प्रकारच्या सहलीचे आयोजन करावे असे विचार केंद्रप्रमुख कुबल सर यांनी मांडले. नाधवडे ब्राह्मण देव येथील खडकातून येणारे नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत(उबाळे )याची पाहणी सुद्धा यावेळी केली. तसेच गवस यांच्या पोल्ट्री फार्मला पण भेट दिली. तेथे असणारे कोंबडी, जर्शी म्हैशी यांची माहिती विद्यार्थ्यांनी घेतले. केंद्रप्रमुख यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स