वायंगणीत युवासेनेचे नारळ लढविणे स्पर्धा संपन्न.
आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा विभागातील वायंगणीतल्या युवासेननेची ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नारळ लढविणे स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत १०० स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत निखिल कांबळी विजेते ठरले आणि अमोल पडवळ उपविजयी ठरले.या स्पर्धेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, मालवणचे माजी बांधकाम सभापती मंदार केणी, वायगणी सरपंच रूपेश पाटकर, युवा सेनेचे प्रमुख समन्वयक मंदार ओरसकर व असंख्य युवासैनिक तसेच शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)