चैतन्या चंद्रकांत सावंत हिने ५६ व्या युवा महोत्सवात कुडाळच्या व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजला मिळवून दिले सुवर्ण पदक..!
मालवण | सुयोग पंडित : मुंबई विद्यापीठ इथे सुरु असलेल्या ५६ व्या युवा महोत्सवात आज संपन्न झालेल्या वक्तृत्व स्पर्धेच्या अंतिम फेरीत व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज, कुडाळच्या चैतन्या चंद्रकांत सावंत यांना सुवर्णपदक प्राप्त झाले आहे.
महाविद्यालयासाठी देखील हे पहिले सुवर्णपदक असून ते आणण्याचा मान चैतन्या यांनी पटकाविला आहे.
चैतन्या सावंत यांना सुप्रसिद्ध साहित्यिक वैशाली पंडित आणि व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळचे प्राध्यापक संग्राम गावडे व अन्य प्राध्यापक वर्ग तसेच चेअरमन व्हिक्टर डांटस यांचे मार्गदर्शन लाभले. चैतन्या सावंत यांचे हे सुवर्णपदक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील महाविद्यालयीन युवा वर्गासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची अभिनंदनाची प्रतिक्रिया जिल्ह्यातून व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)