ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
घरगुती गॅसच्या किंमतीत मोठी घट ; मोदी सरकारचा निर्णय.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

घरगुती गॅसच्या किंमतीत मोठी घट ; मोदी सरकारचा निर्णय.

प्रकाशन: 29 Aug 2023 03:57 PM
वाचन संख्या 291

ब्युरो न्यूज | नवी दिल्ली : सध्या महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला केंद्र सरकारने एक दिलासा दिला आहे. सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात २०० रुपयांपर्यंत कपात केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात गॅस सिलेंडर दर कपातीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता घरगुती गॅस सिलेंडर २०० रुपयांनी स्वस्त होणार आहे. सरकारची २०० रुपयांची सबसिडी उज्ज्वला योजनेतंर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना मिळणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक गॅससिलेंडरमध्ये १०० रुपये कपात केली होती. परंतु घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलाही बदल झाला नव्हता. पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजीच्या दरात बदल करतात. सूत्रांच्या माहितीनुसार, उज्ज्वला योजनेतंर्गत घरगुती गॅस सिलेंडरचे दर २०० रुपयांनी स्वस्त होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

परंतु केंद्र सरकारने हे स्पष्ट केले आहे की, घरगुती गॅस सिलेंडरवरील ही सबसिडी केवळ उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार आहे. इतर अन्य घरगुती गॅस सिलेंडरवर ही सबसिडी लागू नसेल. उज्ज्वला योजनेतंर्गत केंद्र सरकार याआधी २०० रुपये सब्सिडी देत होते. त्यात आता अतिरिक्त २०० रुपये सबसिडी मिळणार आहे. उज्ज्वला योजनेत लाभार्थ्यांना एकूण १ वर्षात १२ घरगुती गॅस सिलेंडरवर सब्सिडीचा लाभ घेता येऊ शकतो.

पंतप्रधान उज्ज्वला योजनेची सुरुवात २०१६ मध्ये करण्यात आली होती. त्यात सरकारने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत घरगुती गॅस कनेक्शन दिले होते. सबसिडी लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक एलपीजी कनेक्शनसोबत लिंक करावा लागेल. सबसिडी चा लाभ आधार कार्डशी लिंक केल्यावरच मिळणार आहे. मार्च २०२३ पर्यंत सरकारी आकडेवारीनुसार, सरकारने उज्ज्वला योजनेत ९ कोटीहून अधिक मोफत गॅस कनेक्शन दिले आहेत. देशात १४.२ किलो घरगुती एलपीजी दरात शेवटचे १ मार्च २०२३ रोजी बदल झाले होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स