ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
अखेर विजय देसाई यांच्या लढ्याला यश..!

अखेर विजय देसाई यांच्या लढ्याला यश..!

प्रकाशन: 27 Aug 2023 01:37 PM
वाचन संख्या 106

डेगवे मोबाईल टाॅवरची बॅटरी भारत संचार निगमने बसवली .

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या डेगवे येथील विजय देसाई यांच्या लढ्याला यश आले असून डेगवे मोबाईल टाॅवरची बॅटरी भारत संचार निगमने बसवली गेली. त्यामुळे डेगवे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

डेगवे गांवात भारत संचार निगम, सावंतवाडी यांनी मोबाईल मनोरा उभारला होता. या मनो-राच्या बॅटरीची अज्ञातांनी चोरी केल्याने डेगवेतील ग्रामस्थांना मोबाईल रेंज अभावी गेले वर्षभर नाहक त्रास सहन करावा लागला होता. याबाबतीत गांवातील ग्रामपंचायत, ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे सदस्य तथा शिवसेनेचे उपविभाग प्रमुख  विजय देसाई यांनी संबंधित कार्यालयातील अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटी व लेखी निवेदने दिली होती. त्यामुळे ठराविक उत्तरापलीकडे काही हालचाल नव्हती.

भारताच्या स्वातंत्र्य दिनी १५ऑगस्टला या कार्यालयाच्या सावंतवाडी येथील आवारात बेमुदत उपोषणास विजय देसाई व डेगवे ग्रामस्थ बसले होते. यावेळी भारत संचार निगम सावंतवाडीचे उपमहाप्रबंधक मा आर. व्ही. जन्ही यांनी उपोषण कर्त्याची  भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. १५ दिवसांपूर्वी हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे लेखी हमी पत्र उपोषणाच्या दिवशी दिले होते. त्यामुळे उपोषण  त्वरित मागे घेतले होते. संबंधित अधिकारी यांनी सत्वर दखल घेऊन गुरुवारी अखेर संबंधित अधिकारी यांनी डेगवे गावातील मोबाईल मनो-याची बँटरी बसविण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी यांचे तसेच याकामात पाठिंबा देणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे, लोकप्रतिनिधींचे व पत्रकार बंधूचे मनापासून आभार डेगवे ग्रामपंचायत सदस्य विजय देसाई यांनी व्यक्त केले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 22
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 329

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स