श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग व सडुरे - शिराळे विकास मंचच्या वतीने सडुरे - शिराळे ग्रामपंचायतच्या हद्दीतील शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप कार्यक्रमांचे आयोजन.
ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य.
वैभववाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या सडुरे- शिराळे ग्रामपंचायतचे ग्रा. पं. सदस्य नवलराज काळे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून आज २५ ऑगस्टला सडुरे – शिराळे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शाळेतल्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटपचा कार्यक्रम आयोजित केला आहे. ग्रामपंचायत कार्यालय येथे सर्व ग्रामस्थ पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. प्राथमिक शाळा क्र. १ मध्ये आज २५ ऑगस्टला सर्व ग्रामपंचायत कमिटीच्या उपस्थितीत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न होणार आहे.
पुढील २ ते ३ दिवसांमध्ये इतर शाळांमध्ये नियोजित वेळ देऊन कार्यक्रम संपन्न केले जातील याची सर्वांनी नोंद घ्यावी अशी माहिती श्री. नवलराज काळे सहकारी व श्री. माऊली चॅरीटेबल ट्रस्ट च्या वतीने देण्यात आली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)