ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आ. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नूतन मालवण तालुका सरपंच व उपसरपंच संघटनेची स्थापना.

आ. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नूतन मालवण तालुका सरपंच व उपसरपंच संघटनेची स्थापना.

प्रकाशन: 24 Aug 2023 06:03 PM
वाचन संख्या 192

अध्यक्षपदी अमोल वस्त, उपाध्यक्षपदी सिया धुरी तर सचिव पदी अविराज परब यांची नियुक्ती.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या लीलांजली हॉल येथे आज आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व सरपंच व उपसरपंच यांची बैठक संपन्न झाली. लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना शासनाच्या विविध योजनांचा लाभ लोकांना कसा मिळवून द्यावा, नागरिकांची छोटी मोठी कामे कशाप्रकारे मार्गी लावावीत याचे उत्तम मार्गदर्शन यावेळी आमदार महोदयांनी उपस्थितांना केले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण तालुक्यातील नवीन सरपंच उपसरपंच संघटनेची स्थापना करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी रेवंडी सरपंच श्री अमोल वस्त, उपाध्यक्षपदी कोळंब गावच्या सरपंच सिया धुरी तर सचिव पदी पळसंबं उपसरपंच श्री अविराज परब यांची नियुक्ती करण्यात आली. आमदार वैभवजी नाईक यांनी सर्व सरपंच व उपसरपंच यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व जनतेच्या कामासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाळ महाभोज, मंदार केणी, दीपा शिंदे, श्वेता सावंत, अरुण लाड, प्रशांत सावंत, महेश जावकर, बाबी जोगी, नंदू गावडे, कमलाकर गावडे, शिल्पा खोत, बंडू सावंत, बंडू चव्हाण, संतोष घाडी, समीर लब्दे, तपस्वी मयेकर, सचिन पाटकर, विजय पालव, राजेश गावकर, संदीप हडकर, लीलाधर पराडकर, दिव्या धुरी, नेहा तोंडवळकर, नम्रता मुद्राळे, हर्षद पाटील, दिनेश परब, अनंत पोईपकर, संतोष पेडणेकर, रणजित परब, दिव्या बागवे, रंजना पडवळ, संतोष पडवळ, लता खोत, श्रद्धा वेंगुर्लेकर, रवींद्र साळकर, अजित लाड, देवेंद्र पुजारे, बाळकृष्ण सावंत, स्वप्नील पुजारे, शामा वाक्कर, संदीप आडवलकर, दुलाजी परब, निनाक्षी शिंदे, सन्मेश परब, राजू मेस्त्री, सचिन मालवणकर, किशोर कासले, भाऊ चव्हाण, अजिंक्य परब, विशाल धुरी, भगवान लुडबे, विजय नेमळेकर, बंड्या सरमळकर, यशवंत गावकर, दीपक किर्लोस्कर आदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 16
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 322

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स