आचरा येथे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बांधकाम कामगार नोंदणी शिबिराचे आयोजन.
जास्तीत जास्त कामगारांनी ऑनलाइन नोंदणी शिबिराचा लाभ घ्यावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आचरा विभागाकडून आवाहन.
आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा तिठा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज शुक्रवारी १७ ऑगस्टला बांधकाम कामगारांसाठी ऑनलाइन नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बांधकाम कामगारांचे ऑनलाइन अर्ज भरून नवीन नोंदणी केली जाणार आहे. कामगारांना शासन स्तरावर कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ही ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.
समीर लब्दे ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आचरा विभाग प्रमुख)
आचरा तिठा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या बांधकाम शिबिराचा जास्तीत जास्त बांधकाम कामगारांनी लाभ घेऊन नोंदणी करून घ्यावी असे आवाहन शिवसेना विभाग प्रमुख समीर लब्दे यांनी केले आहे.
अनंत पाटकर ( आ. वैभव नाईक यांचे स्विय सहाय्यक.)
नोंदणीसाठी खालील नमूद कागदपत्र सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.
(सर्व कागदपत्रे ओरिजनल लागतील)
१) फोटो
२) आधार कार्ड
३) बँक पासबुक
४) रेशन कार्ड
५) ग्रामसेवक दाखला
६) कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड
अधिक माहितीसाठी,
अनंत पाटकर ( आ. वैभव नाईक यांचे स्विय सहाय्यक) : ९०११९९५५०३ आणि समीर लब्दे ( विभाग प्रमुख, आचरा ) : ८२०८०२६२२१ या क्रमांकांवर संपर्क साधायचे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)