मालवण पेंडुर येथील सुलोचना आकेरकर यांचे निधन.
शिरगांव | संतोष साळसकर : मालवण तालुक्यातील पेंडुर – सोनारवाडी येथील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक सुलोचना सत्यवान आकेरकर ( ९७ ) यांचे सोमवारी दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मुंबई लोअर परेल येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात २ विवाहित मुलगे, ३ सूना, भाऊ, जावई, नातवंडे, पंतवंडे असा मोठा परिवार आहे.
तेली सेवा समाज मुंबई चे माजी सेक्रेटरी, श्री विश्र्वेश्वर सहकारी पतपेढीचे माजी सेक्रेटरी, सहकारी पतसंस्था व गृहनिर्माण सहकारी संस्थेचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि प्रशासक प्रदीप आकेरकर आणि राजेंद्र आकेरकर यांच्या त्या मातोश्री होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)