ओझर विद्यामंदिरात विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप; बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट सांताक्रुझचे सहकार्य.
मुख्याध्यापक डि. डि. जाधव यांनी प्रशाले तर्फे बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्टचे मानले आभार.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित, ओझर विद्यामंदिर कांदळगांव प्रशालेत मुंबई येथील सुप्रसिद्ध सेवाभावी संस्था ‘बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट सांताक्रुझ मुंबई’, या संस्थेच्या वतीने
सालाबादप्रमाणे यावर्षीही नुकतेच शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समितीचे संचालक तथा बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार दिनकरराव राणे यांच्या सहकार्याने ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेमध्ये हा उपक्रम बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षी राबविण्यात येतो. ट्रस्टच्या वतीने यापूर्वीही अनेक वेळा ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरणही करण्यात आलेले आहे.
विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप केल्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्टचे आभार मानले. मोफत वह्या वाटप कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन प्रवीण पारकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे, ओझर विद्यामंदिरचे सर्व विद्यार्थी, व ेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पी. के. राणे यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)