ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
त्रिंबक येथे मेरी मिट्टी मेरा देश अभियानाचा समारोप.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

त्रिंबक येथे मेरी मिट्टी मेरा देश अभियानाचा समारोप.

प्रकाशन: 17 Aug 2023 08:04 AM
वाचन संख्या 149

मसुरे | प्रतिनिधी : भारत देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ग्रामपंचायत त्रिंबक मार्फत ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानाचा समारोप विविध उपक्रमांनी करण्यात आला. सकाळी शालांत परीक्षेत जनता विद्या मंदीर त्रिंबक प्रशालेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या कुमार मनोहर घाडिगांवकर याच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्रिंबक ग्रामपंचायत सरपंच श्री. किशोर त्रिंबककर यांच्या हस्ते शिला फलकाचे अनावरण करण्यात आले. उपस्थित ग्रामस्थांनी प्रज्वलीत पणत्या हातात घेऊन ‘पंचप्राण शपथ’ घेतली.

ग्रामपंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमात माजी स्वातंत्र सैनिक कुटुंबीय, सेवानिवृत्त सैनिक, पोलिस यांचा माननीय सरपंच श्री.किशोर त्रिंबककर, उपसरपंच श्री. आशिष बागवे व इतर मान्यवरांचे हस्ते शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

जनता विद्या मंदिर प्रशाला आवारात उपास्थित मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच श्री. किशोर त्रिंबककर, उपसरपंच श्री .आशिष बागवे, मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री. अशोक बागवे, ग्रामसेविका सौ माधुरी कामतेकर यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केद्रप्रमुख श्री. प्रसाद चिंदरकर यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स