ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ना. रविंद्र चव्हाण यांना पालकमंत्री म्हणून स्विकारले नसल्याची आमदार वैभव नाईक यांची टीका.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ना. रविंद्र चव्हाण यांना पालकमंत्री म्हणून स्विकारले नसल्याची आमदार वैभव नाईक यांची टीका.

प्रकाशन: 16 Aug 2023 01:52 PM
वाचन संख्या 146

महामार्गाची दुरुस्ती करायला असमर्थ असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची वेगळ्या अस्तित्वासाठी धडपड व धुसफूस चव्हाट्यावर येत असल्याचा लगावला टोला.

मालवण | सुयोग पंडित : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर महामार्ग दुरुस्तीबाबत टीका करताना भाजप पक्षापासून खासदार नारायण राणे आपले वेगळे अस्तित्व तयार करण्यासाठी धडपडतायत असा टोला लगावला आहे. गणेश चतुर्थी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून मुंबई गोवा महामार्गाची अवस्था दयनीय बनली आहे.गणेश चतुर्थीच्या अगोदर हा रस्ता सुस्थितीत न झाल्यास चाकरमान्यांचा महामार्गावरील प्रवास धोकादायक बनणार आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गाचे काम पूर्ण करून घेण्यात आले. हा महामार्ग केंद्र सरकारच्या आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असून केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे उर्वरित महामार्गाची दुरुस्ती करण्यास असमर्थ ठरले आहेत. तर दुसरीकडे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे खड्डेमय झालेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र ना. रविंद्र चव्हाण यांच्यावर नारायण राणेंना विश्वास नसल्याने राणेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महामार्ग दुरुस्तीसाठी निवेदन देऊन मागणी केली असा टोला कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी राणेंना लगावला आहे.

आमदार वैभव नाईक पुढे म्हणाले की गेली दिड वर्षे रविंद्र चव्हाण हे सिंधुदुर्गचे पालकमंत्री आहेत. परंतु राणेंनी अद्यापही रविंद्र चव्हाण यांना पालकमंत्री म्हणून स्वीकारलेले नाही. आपल्या मुलाला मंत्री बनवून पालकमंत्री करण्यासाठी राणेंनी लॉबिंग केली होती मात्र ती अपयशी ठरल्याने जिल्ह्यात भाजप विरहित आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी राणेंची धडपड सुरु आहे. त्यामुळे नारायण राणेंची रविंद्र चव्हाण यांच्याबाबतीत असलेली धुसफूस आता चव्हाट्यावर येत आहे.रविंद्र चव्हाण यांनी मंजूर केलेली विकासाची कामे रखडविण्यासाठी राणे पडद्यामागची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे एकंदर जिल्ह्याच्या विकासाचा खेळ सुरु आहे. राणेंनी आपल्याच भाजप पक्षाच्या पालकमंत्र्यांवर विश्वास न ठेवल्यास जनता आणि विरोधक तरी विश्वास कसे ठेवतील, असा प्रश्न आ.वैभव नाईक यांनी उपस्थित करत पालकमंत्र्यांना जिल्ह्याच्या विकासासाठी आपले कायम सहकार्य राहील असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले आहे. राणे पिता पुत्र हे महामार्गावरील टोलनाक्याचे टेंडर मिळवून टोल वसुली सुरू करण्यासाठी धडपड करीत आहेत त्यामुळे टोलनाक्यासाठीच राणेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती का अशीही शंका लोकांच्या मनात उपस्थित होत असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 305

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स